Home लेटेस्ट मराठी न्यूज India ‘चीन विरुद्ध मोठ्या संघर्षाची शक्यता’, जशास तसे उत्तर देण्याचा CDS रावत यांचा...

‘चीन विरुद्ध मोठ्या संघर्षाची शक्यता’, जशास तसे उत्तर देण्याचा CDS रावत यांचा इशारा | National


‘भारत कुठल्याही परिस्थितीत LACवरचा बदल मान्य करणार नाही. भारताला जैसे थे स्थिती हवी आहे. भारताने चिनी लष्कराला अतिशय चोख उत्तर दिलंय.’

मुंबई 06 नोव्हेंबर: चीन सीमेवर अजुनही तणावाची परिस्थिती आहे. भारत आणि चीनमध्ये लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेची आठवी फेरी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. सध्याची स्थिती पाहता युद्धाची शक्यता वाटत नाही. मात्र चीन सोबत मोठा संघर्ष होऊ शकतो असे स्पष्ट संकेत रावत यांनी दिले. जे कुणी अकारण धाडस दाखवून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतील त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.

रावत म्हणाले, लडाख सीमेजवळ अजुनही तणावाची स्थिती आहे. भारत कुठल्याही परिस्थितीत LACवरचा बदल मान्य करणार नाही. भारताला जैसे थे स्थिती हवी आहे. भारताने चिनी लष्कराला अतिशय चोख उत्तर दिलं असून त्यामुळे त्यांना धक्का बसल्याचंही त्यांनी सांगितलं.

राजधानी दिल्लीतल्या नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये ते बोलत होते. चीन हा पाकिस्तानला मदत करत आहे. भारतापुढे चीन आणि पाकिस्तान या दोन देशांचं आव्हान आहे असंही ते म्हणाले.

या आधी  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनीही विजयादशमीच्या दिवशी चीन आणि पाकिस्तानला कडक इशारा दिला होता. चीनसह एलएसीवर सुरू असलेल्या तणावादरम्यान डोभाल यांनी संतांच्या एका सभेला संबोधित करताना सांगितले की, भारत नव्या पद्धतीने विचार करतो आणि आम्ही भारतातच नाही तर परदेशातील जमिनीवरही लढू. आम्हाला जेथेही संकट दिसेल..आम्ही तेथे प्रहार करू.

डोभाल उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील परमार्थ निकेतन आश्रमातील उपस्थितांना संबोधित करीत होते. ते यावेळी म्हणाले की, आम्ही यापूर्वी कोणावरही आक्रमण केलं नाही. याबाबत सर्व देशांचे स्वत:चे विचार आहेत. मात्र देशाचा बचाव करणे आवश्यक आहे. जेथे संकट आहे, धोका आहे तेथे आम्ही संघर्ष करू आणि देशाचं रक्षण करू.


Published by:
Ajay Kautikwar


First published:
November 6, 2020, 5:38 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular