Home शहरं Mumbai चिंता वाढली! मुंबईला कोरोनासोबत व्हायरल आजाराचा विळखा coronavirus in mumbai viral infection...

चिंता वाढली! मुंबईला कोरोनासोबत व्हायरल आजाराचा विळखा coronavirus in mumbai viral infection disease mhkk | News


वातावरणातील सातत्यानं होणाऱ्या बदलामुळे व्हायरल आजारांचं प्रमाण मुंबईत कोरोनासोबत वाढताना पाहायला मिळतंय.

मुंबई, 17 मे : कोरोनाचं थैमान एकीकडे मुंबईसह उपनगरांमध्ये सुरू असतानाच हवामानातील बदलामुळे अनेक आजार होत आहेत. आधीच कोरोनामुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांना ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, हाडं दुखणं आणि डोके दुखीनं ग्रासलं आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी दवाखाने बंद ठेवण्यात आल्यानं रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात जावं लागत आहे. तिथे कोरोनाचा धोका इतरांना होऊ नये यासाठी डॉक्टरांना कसरत करावी लागत आहे.

वातावरणातील सातत्यानं होणाऱ्या बदलामुळे व्हायरल आजारांचं प्रमाण मुंबईत कोरोनासोबत वाढताना पाहायला मिळतंय. खासगी दवाखान्यात 100 रुग्णांना जवळपास ताप, सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी आणि अशक्तपणाची लक्षणं आढळली आहेत. व्हायरलची लक्षण एक आठवड्यापेक्षा जास्त राहात असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं हिताचं आहे.

यामध्ये दुसरा धोका असा आहे की ताप सर्दी खोकला असणाऱ्या प्रत्येकाच्या चाचण्या केल्याच जातायत असं नाही. दोन आठवड्यांनी केलेल्या चाचण्यांनंतर कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. य़ाशिवाय रुग्णालयांमध्ये जाणाऱ्यांना कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे लोकांच्या मनात भीती आहे. दुसरीकडे व्हायरल आजारांमुळे अशक्तपणा येतो त्यामुळे ब्लड प्रेशर आणि प्लेटलेट कमी होत असल्याचं दिसत आढळून आलं आहे.

हे वाचा-मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात मिनी बसचा चक्काचूर, 5 जण गंभीर

हे वाचा-मोठी बातमी! महाराष्ट्रात 31 मेपर्यंत LOCKDOWN वाढवला, जाणून घ्या कसा चौथा टप्पा

First Published: May 17, 2020 02:45 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular