Home लेटेस्ट मराठी न्यूज India घर गाठण्यासाठी कुटुंबासह 800 किमी केला होता प्रवास, लेकरांना भूक लागली म्हणून......

घर गाठण्यासाठी कुटुंबासह 800 किमी केला होता प्रवास, लेकरांना भूक लागली म्हणून… | National


लॉकडाऊनमुळे मजूर शक्य त्या परिस्थितीत घर गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये अनेक मजुरांचा जीवही गेला आहे.

छतरपूर, 17 मे : देशभरात सुरू असलेला कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. मजुरांचे हाल होत असल्याने विविध ठिकाणी सरकारने कामं सुरू केली आहेत. मजुरांना त्रास सहन करावा लागू नये शिवाय अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी ते आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.

लॉकडाऊनमुळे प्रवासी मजुरांनी विविध प्रकारे स्वत:चा जीव धोक्यात घालून हजारो किमीचा प्रवास करुन घर गाठलं. काहींनी प्रवासातच आपला जीव सोडला. भूक आणि गरीबी या मजुरांना शहरात राहू देईना. शेवटी त्यांनी घराकडची वाट धरली.

अशीच एक घटना छतरपूरमधील हरपालपुरमधील आहे. येथील पंजाबहून 800 किमीहून अधिक प्रवास रिक्षाने करीत एक मजूर आपल्या परिवरासह छतरपूर पोहोचला. अजूनही त्यांना उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील सिमरिया गावापर्यंत जायचं होतं. कडकडीत ऊन आणि सामान रिक्षात भरुन तो मजूर आपल्या 3 लेकरांना घेऊन निघाला होता. एक आठवड्यांनंतर तो हरपालपूर पोहोचला. यादरम्यान रस्त्यात काही मिळालं नाही म्हणून पाणी देऊनच तो रस्ता कापत होता.

लखनलाल पंजाबमध्ये मजुराचे काम करतो. लॉकडाऊनमध्ये हाताला काम नव्हतं. त्यामुळे घरमालकाने वीजेचं बिल घेऊन त्याला हाकलून दिलं. शेवटी कसंबसं रिक्षाची सोय करुन तो कुटुंबासह घरी जाण्यास निघाला. अजूनही घरी पोहोचण्यासाठी त्याला 200 किमीचा टप्पा पार करायचा आहे. हातात मुलांना खायला द्यायला काहीच नाही. उपाशी पोटी त्यांचा प्रवास सुरू आहे. खायला द्यायला काही नसल्याने तो पाणी पाजून लेकरांचं पोट भरतोय.

संबंधित -8 दिवसांच्या उपचारानंतरही माजी मुख्यमंत्र्यांची प्रकृती गंभीर. डॉक्टरांची माहिती

ट्रकने दुचाकीला दिली धडक, सुरक्षारक्षक चाकाखाली सापडला तर मित्र…

First Published: May 17, 2020 03:36 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular