Home लेटेस्ट मराठी न्यूज घरबसल्या 10 मिनिटांत फ्रीमध्ये बनवा Pan Card; जाणून घ्या प्रक्रिया how to...

घरबसल्या 10 मिनिटांत फ्रीमध्ये बनवा Pan Card; जाणून घ्या प्रक्रिया how to apply for new online pan card how to get new pan card know process mhkb | Technology


प्रत्येकाचं पॅन कार्ड असणं अतिशय आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल, तर घरबसल्या पॅन कार्ड फ्रीमध्ये बनवता येणार आहे.

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : पॅन कार्ड (pan card) अनेक कामांसाठी, महत्त्वपूर्ण डॉक्यूमेंट मानलं जातं. इनकम टॅक्स रिटर्न करायचं असेल, बँकेत 50000 हून अधिक रक्कम काढायची असेल, वाहन खरेदी अशा अनेक कामांसाठी पॅन कार्ड मागितलं जातं. त्यामुळे प्रत्येकाचं पॅन कार्ड असणं अतिशय आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल, तर घरबसल्या पॅन कार्ड फ्रीमध्ये बनवता येणार आहे.

पॅन कार्डसाठी ऑनलाईन (online pan card) अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि सहज आहे. ऑनलाईन पद्धतीने अगदी 10 मिनिटांत ई-पॅन कार्ड (e-pan card) मिळवता येतं. अर्ज केल्यानंतर काही वेळात ई-पॅन कार्ड डाऊनलोड करता येईल.

(वाचा – घरबसल्या PAN Card ऑनलाईन कसं अपडेट कराल, जाणून घ्या)

e-pan card बनवण्यासाठी कागदपत्र –

ज्यांच्याकडे अजूनही पॅन कार्ड नाही, ते या ऑनलाईन पॅन कार्डसाठी अर्ज करू शकतात. e-pan card साठी आधार क्रमांक देणं गरजेचं आहे. (aadhar card number) संपूर्ण प्रक्रियेनंतर, ओटीपी जनरेट झाल्यावर e-pan card मिळेल.

e-pan card प्रक्रिया –

– आयकर विभागाच्या https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वेबसाईटवर जा.

– तेथे Instant PAN through Aadhaar New लिंकवर क्लिक करा.

– त्यानंतर दोन ऑप्शन ओपन होतील, त्यापैकी Get New PAN वर जा.

– त्यानंतर आधार कार्ड क्रमांक भरावा लागेल.

– त्यानंतर कॅप्चा कोड भरा.

(वाचा – मेसेजिंगसाठी भारतीय लष्कराचं नवं App! WhatsApp पेक्षा सुरक्षित असल्याचा दावा)

– आधार कार्ड रजिस्टर असलेल्या फोन नंबर OTP येईल.

– OTP आधार कार्डच्या सत्यतेची पडताळणी करेल.

– त्यानंतर त्वरित e-pan मिळेल. ते डाऊनलोड करा.

या पॅन कार्डची कॉपी हवी असल्यास, 50 रुपयांत e-pan ची प्रिंट काढता येते.


Published by:
Karishma Bhurke


First published:
October 30, 2020, 6:32 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular