Home Uncategorised गरीब मजुरांसाठी धावून आला भारताचा क्रिकेटपटू, केली मोठी मदत

गरीब मजुरांसाठी धावून आला भारताचा क्रिकेटपटू, केली मोठी मदत


लॉकडाऊनच्या काळात काही गरीब मजुरांवर उपासमीरीची वेळ आली आहे. या मजुरांसाठी आता भारताचा क्रिकेटपटू धावून आला असून त्याने मोठी मदत केल्याचे पाहायला मिळत आहेत.

सध्याच्या काळात भारतामध्ये करोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण आहे. या काळात मजुर बेरोजगार झाले आहेत. त्यांच्याकडे सध्याच्या घडीला कुठलेही काम नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या मजुरांच्या मदतीसाठी आता भारताचा एक क्रिकेटपटू पुढे आल्याचे पाहायला मिळत आहे.

लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. पण जे रोजंदारीवर काम करतात ते घरीच बसून आहेत. कारण त्यांचे काम अजूनही सुरुच झालेले नाही. भारतामध्ये लॉकडाऊन सुरु होऊन आता दोन महिने झाले आहेत. दोन महिने हे मजूर घरीच बसून आहेत, त्यांना कोणताही रोजगार नाही. त्यामुळे आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता नेमके काय करायचे, हा प्रश्न त्यांच्यापुढे पडेला आहे.

भारताचा युवा क्रिकेटपटू सर्फराज खान हा मजुरांच्या मदतीसाठी धावून आला आहे. सध्याच्या घडीला स्थलांतरीत मजूर आपल्या गावी परतत आहेत. पण गावी परतल्यावर काय करायचे, हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे. कारण सध्याच्या घडीला त्यांच्या गाठिशी काहीच नाही. त्यामुळे या मजूरांसाठी आता सर्फराज, त्याचा भाऊ मुशीर आणि वडिल नौशाद हे धावून आले आहेत. या मजूरांना त्यांनी फूड पॅकेट्सचे वाटप केले आहे. आतापर्यंत एक हजार मजूरांची मदत त्यांनी केली आहे.

सर्फराज हा मुंबईसाठी खेळतो. सर्फराजने गेल्या मोसमात दमदार कामगिरी केली होती. पण सध्याच्या घडीला तो आपल्या गावी आझमगढ येथे अडकलेला आहे. येथील मजूरांसाठी त्याने मदतीचा हात पुढे केला आहे.

याबाबत सर्फराज म्हणाला की, ” आम्ही एकदा मार्केटमध्ये आलो होतो. त्यावेळी या मजूरांची अवस्था आम्ही पाहिली त्यावेळी माझ्या वडिलांनी यांना मदत करायला हवी, असे सांगितले. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून या मजूरांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.”Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular