Home लेटेस्ट मराठी न्यूज खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे अजितदादा नाराज आहेत का? शरद पवारांनी दिलं हे उत्तर...

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे अजितदादा नाराज आहेत का? शरद पवारांनी दिलं हे उत्तर | News


‘ एकनाथ खडसे यांनी एकदा शब्द दिला म्हणजे तो शब्द खरा केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे आता काहीही काळजीचं कारण नाही.’

मुंबई 23 ऑक्टोबर: एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठा फायदा होईल. एकनाथ खडसे यांनी एकदा शब्द दिला म्हणजे तो शब्द खरा केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे आता काहीही काळजीचं कारण नाही. खडसे यांनी जाहीरपणे शब्द दिलेला आहे असं सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ खडसे यांचं कौतुक केलं. काही लोक अजित पवार नाराज आहेत अशी चर्चा करत आहे त्यावरही पवारांनी टीका केली.

अजित पवार हे नाराज असण्याचं काहीही कारण नाही. फक्त कोरोनाचं संकट असल्याने काळजी घ्यावी लागते, त्यामुळे ते घरी आहेत असं सांगत त्यांनी चर्चेला विराम जेण्याचा प्रयत्न केला.

एकनाथ खडसे यांनी अखेर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकनाथ खडसे यांचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर नाथाभाऊंची वर्णी लागण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपकडून अन्याय झाल्याची भावना एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली..

भाजपला रामराम ठोकून अखेर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. भाजपचे कमळ मागे सोडत खडसेंनी आता घड्याळ हाती घेतलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे देखील उपस्थित होत्या. तर एकनाथ खडसे यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली होती.

जयंत पाटील काय म्हणाले?

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करत असताना आज राष्ट्रवादीच्या कार्यालयात वेगळं दृष्य दिसलं. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याची शरद पवारांची सूचना असतानाही कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नावं न घेता सूचक इशारा दिला. यावेळी जे टीव्हीवर हा कार्यक्रम पाहात असतील त्यांना आता कळलं असेल की टायगर जिंदा है, पिक्चर अभी बाकी है असं जयंत पाटील म्हणाले.

पाटील म्हणाले, अनेकांना शरद पवार यांनी घडवलं त्यांनी ऐन लोकसभेत दगा दिला, सोडून गेले, शरद पवार यांना ईडी ची नोटीस दिली. सुडाचं राजकारण केलं गेलं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. खडसे यांच्या राष्ट्रवादीत येण्यामुळे पक्षाला फायदा होईल असंही ते म्हणाले.


Published by:
Ajay Kautikwar


First published:
October 23, 2020, 4:39 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular