Home लेटेस्ट मराठी न्यूज कोरोना लशीच्या अंतिम टप्प्यातील चाचणीचं मोठं आव्हान, 10 लशींमध्ये अशी आहे चुरस...

कोरोना लशीच्या अंतिम टप्प्यातील चाचणीचं मोठं आव्हान, 10 लशींमध्ये अशी आहे चुरस coronavirus vaccine tracker 10 covid19 vaccine candidates in the world mhkk | Coronavirus-latest-news


या दहा लशी कोणत्या अंतिम टप्प्यातील चाचणी म्हणजे काय आणि या दहा लशींमध्ये कशी चुरस आहे आणि कोणती पहिली लस बाजारात उपलब्ध होऊ शकते याबाबत जाणून घेणार आहोत.

मुंबई, 02 नोव्हेंबर : जगभरात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असताना सर्वजण लस कधी येणार याकडे डोळे लावून बसले आहेत. युरोपीय देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरू झाल्यानं पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत एक आशेचा किरण म्हणजे सध्या कोरोना विषाणूवरील 10 लशींची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू आहे. या दहा लशी कोणत्या अंतिम टप्प्यातील चाचणी म्हणजे काय आणि या दहा लशींमध्ये कशी चुरस आहे आणि कोणती पहिली लस बाजारात उपलब्ध होऊ शकते याबाबत जाणून घेणार आहोत.

काही कंपन्यांनी डिसेंबरपर्यंत तर काहींनी नव्या वर्षांच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीपर्यंत कोरोनाची लस येईल असा दावा केला आहे. ऑक्सफोर्ड आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या लशीला इमरजन्सीसाठी परवानी मिळाली तर डिसेंबरपर्यंत उपलब्ध होऊ शकते असंही सीरमच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

या लशीच्या चाचण्या कशा होतात काय असते प्रक्रिया?

फेज 1- या फेजमध्ये कमी लोकांना डोस दिला जातो. त्यातून लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासली जाते.

फेज 2- पहिल्या टप्प्याच्या तुलनेत थोडे अधिक स्वयंसेवक असतात. यामध्ये लस दिल्यानंतर होणारे परिणाम, दुष्परिणाम अगदी बारकावे तपासले जातात.

फेज 3 – पहिल्या दोन चाचण्या यशस्वी झाल्यानंतर, चाचण्यांची शेवटची फेरी मंजूर झाली. चाचणी मोठ्या प्रमाणात होते आणि त्यात हजारो सहभागी असतात. या चाचणीत, जागतिक स्तरावर लसीचा वापर होऊ शकतो की नाही हे पाहण्यासाठी विविध जाती, वय, लिंग आणि भौगोलिक क्षेत्रातील लोकांना लसी दिली जाते. या चाचणीत सर्वात मोठा नमुना आकार असल्याने त्याचे परिणाम यावर बरेच काही अवलंबून असते.

हे वाचा-WHOचे जनरल डायरेक्टर कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात, स्वत: झाले क्वारंटाइन

या सगळ्याचा डेटा ड्रग रेगुलेटरकडे पाठवला जातो. त्यावर पुढील निर्णय घेतले जातात याशिवाय लशीचं उत्पादन, परिणामकारता, कशी पोहोचवायची कोणाला द्यायची अशा बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.

चीनच्या 4 लशी सध्या तिसऱ्या टप्प्यात

चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोनावर आता चीननं 4 लशी तयार केल्याची माहिती मिळाली आहे. या तिन्ही लशी सध्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. Sinovac, inopharm, Sinopharm, CanSino Biological Inc.या चार लशीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहेत.

मॉडर्न आणि फाइजर यांनी तयार केलेली लस अंतिम टप्प्यात

अमेरिकेनं तयार केलेली ही लस सध्या अॅडव्हान्स आणि अंतिम टप्प्यात आहे. या लशीसाठी फंडिगही मिळत आहे.

रशियाची Sputnik V वॅक्सीनची ट्रालय

मॉस्कोमध्ये या लशीची परवानगी मिळाल्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या टप्प्यात ट्रायल सुरू आहे. पण इतर देश अद्यापही या लशीच्या सुरक्षेच्या बाबात चिंतेत असल्यानं इतर देशांनी याचं ट्रायल सुरू केलं नाही.

Novavax लस शेवटच्या टप्प्यात

अमेरिकेच्या कंपनीने तयार केलेली Novavax ही लस सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. याशिवाय जॉन्सन अॅण्ड जॉन्सनही आता वृद्धांनंतर युवकांवर लशीची चाचणी करत आहे.

भारत बायोटेकनं तयार केलेली कोरोनाची लस

भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली कोरोनाच्या लशीची शेवटच्या टप्प्यातील चाचणी नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. ही लस साधारण 2021 च्या दुसऱ्या तिमाहीत येईल असंही सांगण्यात आलं आहे.


First published:
November 2, 2020, 12:09 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular