Home लेटेस्ट मराठी न्यूज कोरोनाविरोधी युद्धाची तयारी पाहण्यासाठी 80 व्या वर्षीही शरद पवार उतरले मैदानात sharad...

कोरोनाविरोधी युद्धाची तयारी पाहण्यासाठी 80 व्या वर्षीही शरद पवार उतरले मैदानात sharad pawar at 80 on ground work visits quarantine centre at mmrda mumbai coronavirus updates | News


मुंबईत Coronavirus चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यामुळे प्रशासनाबरोबर नेत्यांनीही कंबर कसून कोरोनाविरोधाच्या युद्धात उडी मारली आहे.

मुंबई, 15 मे : कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वाढत असताना आता चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना योद्धे, राजकीय नेते, प्रशासन सगळेच या लढाईत मैदानात उतरत आहेत. Coronavirus चा संसर्ग वाढत असल्याने नव्या उपाययोजना राज्य सरकारने योजल्या आहेत. त्यापैकी एक MMRDA च्या मैदानात क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याची पाहणी करण्यासाठी 80 व्या वर्षीसुद्धा शरद पवार स्वतः त्या ठिकाणी गेले.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह शरद पवार यांनी या मैदानावरच्या क्वारंटाईन सेंटरला भेट दिली आणि तिथल्या सुविधांचा आढावा घेतला.

देशात कोरोना व्हायरसचा फैलाव झपाट्याने पसरत आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात आहे. मुंबई, पुण्यात कोरोनाचे सर्वाधित रुग्ण आहेत. धक्कादायक म्हणजे कोरोनाबाधित रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे अधिकाधिक क्वारंटाइन सेंटर उपलब्ध करून देण्याचं आव्हान प्रशासनापुढे आहे.

कोरोना रोखण्यासाठी देश जवळपास दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेची चाकं थांबली आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा चिंता व्यक्त केली आहे. याबाबत शरद पवार यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे.

कसा असणार लॉकडाऊनचा चौथा टप्पा, पवारांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक

कोरोना व्हायरसचा मोठा फटका साखर उद्योगाला बसला आहे. यामुळे साखर उद्योग डबघाईस जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साखर उद्योगाला पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. यासोबतच साखर उद्योगाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शरद पवार यांनी केंद्र सरकारला 5 उपाय सुचवले आहेत. गेल्या काही दिवसात पवारांनी मोदींना लिहिलेले हे तिसरे पत्र आहे.

आषाढी वारीसंदर्भात आज अजित पवारांनी घेतली बैठक, पण…

चालून चालून थकलेल्या मजुरांचा सुटला धीर, दोघांचा वाटेत मृत्यू तर एकाची नदीत उडी

First Published: May 15, 2020 07:33 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular