Home लेटेस्ट मराठी न्यूज ‘कोरोना’वर मात केल्यानंतर  देवेंद्र फडणवीसांना डिस्चार्ज, 10 दिवस राहणार होम क्वारंटाईन |...

‘कोरोना’वर मात केल्यानंतर  देवेंद्र फडणवीसांना डिस्चार्ज, 10 दिवस राहणार होम क्वारंटाईन | News


कोरोना झाल्यानंतर त्यांनी कुठल्याही मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये न जाता त्यांनी सेंट जॉर्ज या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला होता.

मुंबई 04 नोव्हेंबर: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. पुढचे 10 दिवस त्यांना डॉक्टरांनी घरीच आराम करण्याचा सल्ला दिला असून ते आता होम क्वारंटाईन होणार आहेत.  मुंबईतल्या सरकारी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.

24 ऑक्टोबरला फडणवीस यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना सेंट जॉर्जमध्ये भरती करण्यात आलं होतं.

देवेंद्र फडणवीस यांना पुढचे 10 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे अधिक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी दिला आहे. फडणवीस त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर राहणार आहेत.

कोरोनाची लागण झाल्यानंतर फडणवीस यांनीच ट्विटरवरून याची माहिती दिली होती.कोरोनाची साथ आल्यापासून मी दिवसरात्र काम करतो आहे. मात्र आता मी ब्रेक घ्यावा असं देवाला वाटत असेल. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून क्वारंटाईन होत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं होतं.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, असा संकेत दिसतो. असंही त्यांनी म्हटलं होतं.

‘एक शेरनी और एक भेडियों का झुंड’, संजय राऊत यांच्या ट्वीटवर कंगनाची प्रतिक्रिया

कोरोना झाल्यानंतर त्यांनी कुठल्याही मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये न जाता त्यांनी सेंट जॉर्ज या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला होता.   कोरोना आढावा दौऱ्यावर असतानाच फडणवीस बोलताना म्हणाले होते की, कोरोनापासून बचावासाठी मी सगळी काळजी घेतो आहे. मात्र कोरोनाची बाधा झालीच तर मला उपचारासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात यावं अशी सूचना मी सहकाऱ्यांना दिली आहे.

त्यांच्या या निर्णयाचं कौतुकही झालं. तर सरकारची व्यवस्था उत्तम असल्यानेच त्यांनी  या हॉस्पिटलची निवड केली असा टोला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लगावला होता.


Published by:
Ajay Kautikwar


First published:
November 4, 2020, 5:24 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular