Home लेटेस्ट मराठी न्यूज कोरोनामध्ये केवळ नातेवाईक व मित्रांसोबत पाहू शकता चित्रपट; थिएटरमध्ये दिली जातेय नवी...

कोरोनामध्ये केवळ नातेवाईक व मित्रांसोबत पाहू शकता चित्रपट; थिएटरमध्ये दिली जातेय नवी ऑफर | Coronavirus-latest-news


चित्रपटगृहांनी प्रेक्षकांसाठी अनोखी ऑफर सुरू केली आहे. यासाठी तुम्हाला केवळ 1999 रुपये खर्च करावे लागतील

नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : कोरोना काळात (Corona era) लोक इतके घाबरले आहे की, अनोखळी व्यक्तींसोबत खाणं-पिणंही सोडून दिलं आहे. अशात दोन ते तीन तास सलग चित्रपटगृहात चित्रपट पाहायला लोकांना भीती वाटते. अशात मल्टीस्क्रीन थिएटर चालविणाऱ्या काही कंपन्यांनी नवीन ऑफर आणली आहे. या नव्या ऑफरमुळे तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत सुरक्षितपणे चित्रपट पाहू शकता. हा प्रकार असा असेल की तुम्ही आपल्या लिव्हींग रुममध्ये चित्रपट पाहात आहात, मात्र पडदा मोठा असेल. या योजनेची घोषणा पीव्हीआर आणि वेव सिनेमा समूहाने केली आहे. यानंतर आणखी काही कंपन्या असा निर्णय घेऊ शकतात.

1999 रुपयांमध्ये करा पीव्हीआर बुक

पीव्हीआर सिनेमाचे सीईओ गौतम दत्ता यांनी सांगितले की, जर कोणी व्यक्ती आपल्या कुटुंबाचे सदस्य आणि मित्रांसह चित्रपटाना आस्वाद घेऊ इच्छित असतील तर ते तसं करू शकतात. लोकांची प्रायव्हसी कायम राहण्यासाठी ते थिएटर एका चित्रपटासाठी रिजर्व्ह करण्याची संधी देत आहेत. रिजर्व्ह करण्यासाठी कमीत कमी 1999 रुपयांचं पॅकेज आहे. यामध्ये अधिकतर 15 ते 20 व्यक्ती चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात. ही व्यवस्था काही ठराविक ठिकाणी राबवण्यात येत आहे.

हे ही वाचा-पतीला सोशल मीडियावर दिसला पत्नीचा प्रियकरासोबतचा Nude Video; संतापाच्या भरात…

लक्जरी थिएटरमध्येही असं पॅकेज

पीव्हीआर समूह देशभरात काही लक्जरी थिएटरही चालवतो. यामध्ये आरामदायी आसन व्यवस्था आहे. सोबतच यामध्ये रिक्लाइनिंग सुविधादेखील आहे. असे थिएटरही बुक करण्याची सुविधा आहे. यासाठी कमीत कमी 4000 रुपये खर्च करावे लागतील. जर तुम्हाला हवं असेल तर खाण्या-पिण्याचे पदार्थही सर्व्ह केले जातील. मात्र यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतील.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत होत असलेली घट कायम आहे. शनिवारी 3959 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली तर नवीन 6748 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 15,69,090 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात सध्या एकूण 99,151 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.


Published by:
Meenal Gangurde


First published:
November 8, 2020, 8:52 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular