Home लेटेस्ट मराठी न्यूज कोरोनाने थैमान घातलेल्या मुंबईसाठी दिलासादायक बातमी, नवी आकडेवारी आली समोर Mumbai Corona...

कोरोनाने थैमान घातलेल्या मुंबईसाठी दिलासादायक बातमी, नवी आकडेवारी आली समोर Mumbai Corona Update number of corona patients came within 1000 mhss | Mumbai


मुंबईत आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. नव्याने होणाऱ्या कोरोनाबधितांची संख्या ही आता हजाराच्या खाली आली आहे.

मुंबई, 27 ऑक्टोबर : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. राजधानी मुंबईत (Mumbai) कोरोनाबाधित रुग्णांची  (corona patients) संख्या सर्वाधिक आहे. मात्र, आता मुंबईत कोरोनाची लाट आता ओसरत चालली आहे. मुंबईत आता नव्याने होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1000 च्या आत आली आहे.

मुंबई महापालिकेनं (mumbai municipal corporation) दिलेल्या नव्या आकडेवारीनुसार, मुंबईत आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.  नव्याने होणाऱ्या कोरोनाबधितांची संख्या आता हजाराच्या खाली आली आहे.  सोमवारी मुंबईत केवळ 804 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंतची ही सर्वात कमी आकडेवारी आहे. त्यामुळे आजवर कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या 252087 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा 88 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत 19 ते 25 ऑक्टोबरपर्यंत मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण हे 0.53 टक्के इतकं राहिले आहे.

सरसंघचालकांनी ‘त्या’ ठेकेदारांचे दात घशात घातले, सेनेचा भाजपला टोला

या नव्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे रोज मृत्यू पावणाऱ्या लोकांच्या संख्येतही घट झाली आहे. सोमवारी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या 37 आहे. तर मुंबईत आजपर्यंत कोरोनामुळे 10099  जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांवर

तर दुसरीकडे  राज्यातही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांवर गेले असून गेल्या तीन महिन्यातील सर्वात कमी नवीन रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी दिवसभरात निच्चांकी नव्या रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात 3 हजार 645 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर बरे होण्याचा दर हा 89 टक्क्यांवर गेला आहे. दिवसभरात 84 जणांचा मृत्यू झाला. राज्यात 1 लाख 34 रुग्णावर उपचार सुरू आहेत. राज्यातल्या कोरोना रुग्णांच एकूण संख्या ही 16 लाख 48 हजारांच्यावर गेली आहे. तर 9 हजार 905 एवढे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ही 14 लाख 70 हजारांच्यावर गेली आहे.

राज्यात कोरोनाची चाचणी दर 980 रुपयांवर

राज्यात खासगी प्रयोगशाळेत (private lab) होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे (Corona Test) दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रति तपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात आले आहे,  त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1400 आणि 1800 रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे, अशी घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

अलर्ट! Coronavirus नं बदलला मानवी शरीरात प्रवेश करण्याचा मार्ग

‘नव्या सुधारीत दरापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही. 4500 रुपयांवरुन 980 रुपयांपर्यंत इतके कमी दर निश्चित करुन सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे’, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.


Published by:
sachin Salve


First published:
October 27, 2020, 9:28 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular