Home लेटेस्ट मराठी न्यूज कोरोनानंतर आता आणखी एका जीवघेण्या आजाराचं संकट; पुरुषांनाच सर्वात जास्त धोका vexas...

कोरोनानंतर आता आणखी एका जीवघेण्या आजाराचं संकट; पुरुषांनाच सर्वात जास्त धोका vexas syndrome scientists discover rare and deadly genetic disease in men mhpl | News


आधी कोरोनाव्हायरसचा (coronavirus) सर्वात जास्त धोका पुरुषांना असल्याचं दिसून आलं आहे, आता पुरुषांना आणखी एक आजार आपली शिकार बनवतो आहे.

वॉशिंग्टन, 29 ऑक्टोबर : सध्या जगभरात कोरोनाव्हायरस (coronavirus) थैमान घालतो आहे. या संकटात आता आणखी एका आजाराचं संकट आहे. अमेरिकेतील (America) शास्त्रज्ञांना अभ्यासादरम्यान एका आनुवंशिक आजाराबाबात (Genetics Disease) माहिती मिळाली आहे. वेक्सास (Vexas) असं या आजाराचं नाव. या आजारामुळे आधीच कित्येकांचा मृत्यू झाला आहे आणि आता काही रुग्ण दिसून आले आहेत. विशेष म्हणजे या आजाराचा सर्वात जास्त धोका पुरुषांनाच आहे, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

अमेरिकेतल्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थच्या (National Institutes of Health – NIH) शास्त्रज्ञांना काही रुग्णांच्या रक्तात गुठळ्या झाल्याचं, त्यांना ताप येत असल्याचं आणि त्यांच्या फुप्फुसात समस्या झाल्याची लक्षणं दिसून आली. मात्र यामागे नेमकं कारण आहे ते समजत नव्हतं.

नॅशनल ह्युमन जिनोम रिसर्च इन्स्टिट्युटचे (NHGRI) क्लिनिकल फेलो डॉ. डेव्हिड बी. बेर म्हणाले, NIH क्लिनिकल सेंटरमध्ये असे रुग्ण आले होते, ज्यांना सूजेची समस्या होती. मात्र त्याचं कारण माहिती नव्हतं. त्यांच्यावर उपचार करणं शक्य नव्हतं. 2,500 रुग्ण लक्षात घेत या आजारावर लक्षणांनुसार उपचार न करात वेगळ्या पद्धतीने उपचार करण्याचं ठरलं. लक्षणांनुसार उपचार करण्याऐवजी जिन्सचा अभ्यास केला.

हे वाचा – रुग्ण बोलत राहिला आणि डॉक्टरांनी केलं मेंदूचं ऑपरेशन; गप्पा मारत काढला ट्युमर

यूबीए1 (UBA1) जीनमध्ये बदलांमुळे हा आनुवंशिक आजार होत असल्याचं संशोधकांना दिसून आलं. या आजाराला त्यांनी vacuoles, E1 enzyme, X-linked, autoinflammatory and somatic syndrome (VEXAS syndrome) असं म्हटलं.

शास्त्रज्ञांच्या मते, वेक्सास सिंड्रोम बहुतेक पुरुषांमध्येच दिसून आला आहे कारण हा एक्स गुणसूत्राशी (X chromosome) संबंधित आहे. पुरुषांमध्ये हा गुणसूत्र फक्त एक असतो तर महिलांमध्ये अतिरिक्त एक्स गुणसूत्र असतो. त्यामुळे या दुसऱ्या गुणसूत्रामुळे महिलांचा बचाव होतो. त्यांना या आजाराचा धोका कमी आहे, तर पुरुषांना जास्त आहे.

हे वाचा – लवकरच पुरुषांसाठीही गर्भनिरोधक औषध; संशोधनात दिसून आला सकारात्मक परिणाम

या आजारामुळे आधीच 40 टक्के रुग्णांचा मृत्यू झाल्याचंही जर्नलमध्ये नमूद करण्यात आलं आहे. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.


Published by:
Priya Lad


First published:
October 29, 2020, 5:37 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular