Home लेटेस्ट मराठी न्यूज कोरोनाच्या संकटात शहीद जवानाच्या पत्नीने केली मदत, आयुष्यभर साठवलेले पैसे केले दान...

कोरोनाच्या संकटात शहीद जवानाच्या पत्नीने केली मदत, आयुष्यभर साठवलेले पैसे केले दान martyer jawan wife donate 2 lakh rupee to pm cares fund mhsy | National


पती शहीद झाल्यानंतर पत्नीने मिळणाऱ्या पेन्शनमधून साठवलेले पैसैे कोरोनाच्या संकटकाळात पीएम केअर फंडात दान केले आहेत.

नवी दिल्ली, 16 मे : कोरोनाच्या संकटात अनेकांनी देशासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यात उत्तराखंडच्या दर्शनी देवी यांनी एक आदर्श समोर ठेवला आहे. 82 वर्षांच्या असलेल्या दर्शनी या एका शहीद जवानाची पत्नी आहेत. त्यांनी पीएम केअर्स फंडात आयुष्यभर साठवलेले पैसे दान केले आहेत. बिपीन रावत यांनी त्यांच्या या कार्याचं कौतुक केलं आहे. दर्शनी देवी यांनी लोकांसमोर एक मोठा आदर्श ठेवला आहे.

आयुष्यभर साठवलेल्या पुंजीतून त्यांनी 2 लाख रुपयांची मदत पंतप्रधान मोदी केअर फंडसाठी दिली आहे. त्यांच्या या उपक्रमाचं संरक्षणप्रमुख बिपीन रावत यांनी कौतुक केलं आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनीही दर्शनी देवी यांना सलाम केला आहे.

दर्शनी देवी यांचे पती भारतीय सैन्यदलात हवालदार पदावर होते. 1965 साली पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात ते शहीद झाले. त्यानंतर श्रीमती दर्शनी देवी यांना पेन्शन मिळत होती. त्यातून जी रक्कम साठवली होती त्यातले 2 लाख रुपये कोरोनाच्या लढाईसाठी पीएम मोदी केअर फंडात दान केले आहेत. अशा लोकांचा आदर्श आपण घेतला पाहिजे आणि शिकलं पाहिजे असं बिपीन रावत यांनी म्हटलं आहे.

हे वाचा : कोरोनातून ठणठणीत होऊन परतली महिला डॉक्टर, शेजाऱ्यांनी तिच्या घराला घातलं कुलूप

दर्शनी देवी यांचा आम्हाला अभिमान आहे. अशी आमची सेना होती आणि अशीच असेल. आपण सगळ्यांनी त्यांच्याकडून हा आदर्श घ्यायला हवा. आपण देशासाठी काही देऊ शकत नाही तर किमान स्वत:चे कर तरी भरा असं आवाहन संरक्षणप्रमुख बिपीन रावत यांनी केलं आहे.

हे वाचा : रेस्टॉरंटने पंतप्रधानांना म्हटलं जागा नाही, टेबल रिकामं होईपर्यंत बघितली वाट

याआधीही दर्शनी देवी यांनी अनेक सामाजिक उपक्रम केले आहेत. श्रीमती दर्शनी देवी यांचे पती 1965 च्या युद्धात शहीद झाले. त्यानंतर दर्शनी देवी यांनी अनेक सामाजिक उपक्रमांना मदतीचा हात दिला आहे.

हे वाचा : लॉकडाऊनमध्ये बोअर झालायत तर हे हॉरर चित्रपट बघा, एकट्यानं पाहण्याचं धाडस नका करू

First Published: May 17, 2020 10:05 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular