Home लेटेस्ट मराठी न्यूज कोरोनाच्या संकटात रुग्णालयांची अवस्था बिकट, नोकरी सोडून नर्स जात आहेत घरी covid...

कोरोनाच्या संकटात रुग्णालयांची अवस्था बिकट, नोकरी सोडून नर्स जात आहेत घरी covid 19 west bengal more than 300 nurses leave job from private hospitals mhsy | National


देशात कोरोनाशी लढाई सुरु असताना रुग्णालयांमधून 300 पेक्षा जास्त नर्सनी नोकरी सोडली आहे.

कोलकाता, 17 मे : पश्चिम बंगालमधील आरोग्य विभागावरच संकट ओढावलं आहे. आधीच कोरोनाशी लढाई सुरु असताना अनेक खाजगी रुग्णालयांमधून 300 पेक्षा जास्त नर्सनी नोकरी सोडली आहे. नर्स नोकरी सोडून मणिपूरसह देशातील इतर भागात त्यांच्या घरी परतल्या आहेत. कोलकात्यातील 17 खासगी आरोग्य संस्थांची द असोसिएशन ठफ हॉस्पिटल्स ऑफ इस्टर्न इंडियांने मुख्य सचिव राजीव सिन्हा यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये हे संकट दूर करण्यासाठी मदतीची मागणी केली आहे.

खासगी रुग्णालयातील सूत्रांनी सांगितलं की, या आठवड्याच्या सुरुवातीला कमीत कमी 185 नर्स मणिपूरला निघून गेल्या. त्यानंतर शनिवारी एकूण 169 नर्स मणिपूर, त्रिपूरा, ओडिसा आणि झारखंडला गेल्याची माहिती मिळत आहे.

एएचआयईचे अध्यक्ष प्रदीप लाल मेहता यांनी पत्रात म्हटलं की, नर्स नोकरी सोडून का जात आहेत याचं काऱण आम्हाला माहिती नाही. पण ज्या नर्स इथं आहेत त्यांना मणिपूर सरकारकडून प्रलोभन दाखवलं जात आहे.

आम्ही सुरुवातीलाच सांगितलं आहे की, कोविड 19 रुग्णांवर उपचार केल्यास त्यांना त्याचा योग्य तो मोबदला आणि बक्षिस दिलं जाईल मात्र तरीही इथं काम करणाऱ्या नर्स आणि डॉक्टरांना योग्य वाटत नसेल तर त्यांचा निर्णय ते घेऊ शकतात. आम्ही त्यांच्यावर दबाव नाही टाकू शकत आणि हेच त्यांच्या परत जाण्याचं कारण असेल असंही पत्रात म्हटलं आहे.

हे वाचा : Breaking कोरोनाला रोखण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊन

मणिपूरला परतलेल्या एका नर्सने सांगितलं की, सुरक्षेची चिंता आणि त्यांच्यावर आई वडिलांकडून नोकरी सोडण्यासाठी दबाव येत होता. नोकरी सोडण्यामागे हेच कारण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचा : Lockdown मध्ये रुग्णालयाने डॉक्टरला काढून टाकलं, निषेधार्थ सुरू केला चहाचा गाडा

पश्चिम बंगालमध्ये कोरोनामुळे आणखी 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 160 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 2576 रुग्ण आढळले आहेत.

हे वाचा : प्रवासी मजूरांच्या मदतीला धावून आला अभिनेता, अशी केली घरी जाण्याची सोय

First Published: May 17, 2020 09:16 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular