Home लेटेस्ट मराठी न्यूज कोरोनाचं संकट, तरी भारत-ऑस्ट्रेलिया मॅचसाठी स्टेडियममध्ये येणार 25 हजार प्रेक्षक cricket India...

कोरोनाचं संकट, तरी भारत-ऑस्ट्रेलिया मॅचसाठी स्टेडियममध्ये येणार 25 हजार प्रेक्षक cricket India vs Australia MCG may allow 25 thousand spectators in stadium mhsd | News


आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर भारतीय टीमची ही पहिलीच सीरिज असणार आहे.

मेलबर्न, 28 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर भारतीय टीमची ही पहिलीच सीरिज असणार आहे. या दौऱ्यामध्ये भारतीय टीम 3 वनडे, 3 टी-20 आणि 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. 17 डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये सुरु होणाऱ्या टेस्ट सीरिजआधी भारतीय टीम सिडनीमध्ये डे-नाईट सराव सामना खेळणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी भारतीय टीमच्या 69 दिवसांच्या दौऱ्याचं वेळापत्रक घोषित केलं. या दौऱ्यात भारतीय टीम सिडनीमध्ये 14 दिवस क्वारंटाईन होणार आहे. 2 नोव्हेंबरपासून क्वारंटाईनच्या कालावधीला सुरुवात होणार आहे. 10 नोव्हेंबरला आयपीएलची फायनल झाल्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉक्सिंग डे टेस्टला प्रेक्षकांना स्टेडियममध्ये बोलावण्याची ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाची तयारी आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अंतरिम सीईओ हॉकले यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. यासाठी बोर्ड व्हिक्टोरिया सरकारसोबत बोलणी करत आहे. ‘आम्ही या मॅचसाठी प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी मिळावी, म्हणून व्हिक्टोरिया सरकार आणि मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड यांच्यासोबत सल्लामसलत करत आहोत,’ असं हॉकले म्हणाले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे टेस्ट मॅचला सुरुवात होत आहे. जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम असलेल्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना होणार आहे. या स्टेडियममध्ये एक लाख प्रेक्षक बसू शकतात, पण क्रिकेट ऑस्ट्रेलिया एक- चथुर्तांश म्हणजेच 25 हजार प्रेक्षकांना परवानगी द्यावी, यासाठी प्रयत्न करत आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली टेस्ट सीरिज 17 डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये सुरू होईल. भारताची परदेशातली ही पहिलीच डे-नाईट टेस्ट असेल. यानंतर मेलबर्नमध्ये 26 डिसेंबरपासून, सिडनीमध्ये 7 जानेवारीपासून आणि ब्रिस्बेनमध्ये 15 जानेवारीपासून टेस्ट मॅच सुरू होईल. टेस्ट सीरिजआधी वनडे आणि टी-20 सीरिज खेळवली जाईल.

बीसीसीआयच्या मागणीनंतर मेलबर्नच्या टेस्ट आणि सिडनीमध्ये होणाऱ्या नवीन वर्षाच्या पहिल्या टेस्टमध्ये एका आठवड्याची विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय टीम 12 नोव्हेंबरला सिडनीमध्ये पोहोचेल. 27 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या मॅचआधी भारतीय टीम सिडनीमध्येच क्वारंटाईन असेल. या दौऱ्यात भारतीय टीम दोन सराव सामनेही खेळणार आहे. 6 ते 8 डिसेंबरला न्यू साऊथ वेल्समध्ये आणि 11 ते 13 डिसेंबरला सिडनीमध्ये डे-नाईट मॅच होईल. या दोन्ही मॅच ऑस्ट्रेलिया-ए विरुद्ध असतील.


Published by:
Shreyas


First published:
October 28, 2020, 10:22 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular