Home लेटेस्ट मराठी न्यूज World काबुल हादरलं; दाट लोकवस्तीत 10 रॉकेट उडवत स्फोट, थरारक VIDEO आला समोर...

काबुल हादरलं; दाट लोकवस्तीत 10 रॉकेट उडवत स्फोट, थरारक VIDEO आला समोर A series of loud explosions densely populated areas in central Kabul mhkb | Videsh


10हून अधिक रॉकेट उडवड स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. जोरदार स्फोटांच्या मालिकेमुळे मध्यवर्ती काबूल हादरलं आहे.

अफगानिस्तान, 21 नोव्हेंबर : अफगानिस्तानची राजधानी असलेलं काबुल एकामागे एक झालेल्या स्फोटांनी हादरलं आहे. 10हून अधिक रॉकेटद्वारे स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. शहराच्या मध्यभागी आणि उत्तरेकडील दाट लोकसंख्या असलेल्या ग्रीन झोनमध्ये हे स्फोट झाले आहेत. जोरदार स्फोटांच्या मालिकेमुळे मध्यवर्ती काबुल हादरलं आहे.

सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या रॉकेट स्फोटात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून 21 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 14 रॉकेटने हे स्फोट घडवून आणल्याची माहिती मिळत आहे.

ग्रीन झोन जवळील अफगानिस्तान राजधानीच्या दाट लोकवस्तीच्या भागात स्फोट झाले आहेत. दोन स्फोट झाल्यानंतर एकामागे एक अनेक रॉकेटद्वारे स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोटावेळी पोलिसांच्या गाडीवर निशाणा साधण्यात आला होता, ज्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. कोणत्याही संघटनेने शनिवारी झालेल्या या स्फोटांची अद्याप जबाबदारी घेतली नाही.


Published by:
Karishma Bhurke


First published:
November 21, 2020, 10:57 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular