Home लेटेस्ट मराठी न्यूज कंगनाला मुंबई पोलिसांची दुसरी नोटीस, आता चौकशीला हजर न राहिल्यास अडचणी वाढणार...

कंगनाला मुंबई पोलिसांची दुसरी नोटीस, आता चौकशीला हजर न राहिल्यास अडचणी वाढणार breaking mumbai police summon actreess kangana ranaut and rangoli chandel for second time mhjb | News


अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि तिची बहिण रंगोली या दोघींना दुसरी नोटीस पाठवली आहे.

मुंबई, 03 नोव्हेंबर: अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि तिची बहिण रंगोली (Rangoli Chandel) या दोघींना दुसरी नोटीस पाठवली आहे. यानुसार कंगनाला 10 नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांनी वांद्रे पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्या प्रकरणी एफआयआर दाखल आहे.

अभिनेत्री कंगना रणौत पहिल्या नोटिशीनंतर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहिली नव्हती. तिने घरात लग्नकार्य असल्याचे कारण दिले होते. त्यामुळे आता अभिनेत्रीला दुसरी नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र जर आता कंगना आणि तिची बहिण रंगोली 10 तारखेला वांद्रे पोलीस ठाण्यात हजर राहिल्या नाहीत तर त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांना मुंबई पोलिसांनी 21 ऑक्टोबर रोजी नोटीस धाडली होती. मुबंई पोलिसांनी दोघींना चौकशीसाठी बोलावलं होतं. देशद्रोहाच्या आरोपांप्रकरणी कंगना रणौतला 26 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगिततं होतं. मात्र यावेळी कंगना मुंबई पोलिसांसमोर हजर राहिली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा कंगनाला नोटीस धाडण्यात आली आहे.

(हे वाचा-कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा रिलेशनशीपमध्ये?अक्षयने असा केला खुलासा)

वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी कंगना रणौत हिच्यासह तिच्या बहिणीविरोधात FIR दाखल केली होती. कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल हिच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणे, धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बॉलिवूडमधील फिटनेस ट्रेनर मुनव्वर अली सय्यद यांनी कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने कंगनाविरूद्ध तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले होत. न्यायायलाच्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी कंगनाविरोधात भादवी कलम कलम 153 ए (धर्म, वंश इत्यादींच्या आधारावर विविध गटांमध्ये कलह वाढवणे), 295 ए (धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतुपुरस्सर कृत्य) आणि 124-ए (देशद्रोह) आणि 34 अंतर्गत एफआयआर दाखल केली होती.

(हे वाचा-भाजप आमदाराची अमिताभ बच्चन यांच्याविरोधात पोलिसात तक्रार)

पहिल्या नोटिशीनंतर कंगनाने सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया दिली होती. आता पुन्हा एकदा तिला नोटीस मिळाल्यानंतर तिची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


Published by:
Janhavi Bhatkar


First published:
November 3, 2020, 12:48 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular