Home लेटेस्ट मराठी न्यूज एकनाथ खडसे माझ्याबद्दल अत्यंत अश्लिल भाषेत बोलले होते, अंजली दमानियांचा पलटवार |...

एकनाथ खडसे माझ्याबद्दल अत्यंत अश्लिल भाषेत बोलले होते, अंजली दमानियांचा पलटवार | Mumbai


‘ खडसे हे खुनशी प्रवृत्तीने नेते आहे. त्यांनी माझा अतोनात छळ केला आहे’

मुंबई, 22 ऑक्टोबर : ‘एकनाथ खडसे हे जळगावमध्ये पत्रकार परिषदेत धांदात खोटे बोलले होते. खडसे माझ्याविरोधात अत्यंत खालच्या भाषेत बोलले होते, तुम्हाला जिथे जायचे तिथे जा, पण तुम्हाला मी सोडणार नाही’, असा पलटवार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

अंजली दमानिया यांनी माझ्या विरोधात खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. पण, आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, भाजप किंवा राष्ट्रवादी यांच्या राजकारणाबद्दल मला काहीही घेणे देणे नाही. खडसे हे खुनशी प्रवृत्तीने नेते आहे. त्यांनी माझा अतोनात छळ केला आहे, असा पलटवार दमानियांनी केला.

3 सप्टेंबर रोजी वाढदिवसाच्या दिवशी झालेल्या सभेत माझ्याबद्दल अश्लिल वक्तव्य केले होते. त्याचे व्हिडिओ आणि ऑडिओ हे माझ्याकडे आले. त्याचे हे व्हिडिओ मी वाकोला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले होते. त्यावेळी पोलिसांनी 501 कलमाखाली गुन्हा दाखल केला होता. ते अत्यंत खालच्या स्तराला जाऊन बोलले होते, असा खुलासा दमानिया यांनी केला होता.

देवेंद्र फडणवीस यांना फक्त सोईचे राजकारण करायचे होते. नेहमी सामाजिक कार्यकर्त्यांबद्दल अशा प्रकारचे राजकारण करण्यात आले होते, अशी टीकाही दमानिया यांनी फडणवीस यांच्यावर केली.

खडसे म्हणाले की, मी खोट्या तक्रारीबद्दल फडणवीस यांना विचारले असता,  त्यांनी दमानिया या गोंधळ घालत होत्या म्हणून असा गुन्हा दाखल करण्यात आला होता असं सांगितलं. मी, फडणवीस यांना विचारू इच्छीत जर खडसे यांनी अमृता फडणवीस यांच्याबद्दल असे वक्तव्य केले असते, तर तुम्ही असंच बोलला असता का? असा सवालही दमानिया यांनी केला.

खडसे यांच्याबद्दलचा खटला अजून संपलेला नाही. त्यांनी जर पुढे कोणत्याही पत्रकार परिषदेत माझ्याबद्दल काहीही वक्तव्य केले तर मी तुम्हाला सोडणार नाही, असा इशाराही दमानियांनी दिला.


Published by:
sachin Salve


First published:
October 22, 2020, 5:03 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular