Home लेटेस्ट मराठी न्यूज उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर भाजपकडून 2 नेते मैदानात, केला जोरदार पलटवार bjp...

उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर भाजपकडून 2 नेते मैदानात, केला जोरदार पलटवार bjp leader ram kadam and atul bhatkhalkar criticizes cm uddhav thackeray mhas | News


उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई, 8 नोव्हेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना कोरोनाच्या स्थितीबाबत माहिती दिली. मात्र त्याचवेळी महाराष्ट्रद्वेषी असं म्हणत भाजपवरही अप्रत्यक्ष हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप नेते आणि प्रवक्ते अतुल भातखळकर आणि राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

‘महाराष्ट्राचा द्वेष करणारे नेमके कोण हे भाषणात मुख्यमंत्री का सांगत नाहीत? शिंखडी प्रमाणे कोणास तरी पुढे करून भाजपवर अशा टीका करण्याचे काम उद्धव ठाकरे करतात. मेट्रो कारशेड आरे येथून का हलवली हे योग्यवेळी सांगू, असं म्हणतात. पण योग्य वेळ येणार कधी? सामान्य शेतकऱ्यांना मदत कधी? एसटी कर्मचारी पगार कधी यावर भाष्य का करत नाही मुख्यमंत्री?’ असा सवाल करत अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.

दुसरीकडे, राम कदम यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘भाजपवर टीका करण्यापेक्षा जनतेसाठी काय केले हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे…मदिरालय उघडे पण मंदिरे बंद का? याचंही उत्तर मुख्यमंत्र्यांनीही द्यावं,’ असा टोला राम कदम यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतला होता भाजपचा समाचार

‘मंदिरे कधी उघडणार असं विचारलं जात आहे. दिवाळीनंतर एक नियामवली केली जाणार आहे. गर्दी टाळणे हाच एक नियम असणार आहे. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांच्या काळजीपोटी मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतला नाही’, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे. तसंच महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम महाराष्ट्र द्वेषी लोकांनी केले होते, पण त्यांचे प्रयत्न हाणून पाडले आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं.


Published by:
Akshay Shitole


First published:
November 8, 2020, 5:25 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular