Home मनोरंजन आलिया भट्टचं ग्लॅमरस फोटोशूट; 'त्या' कॅप्शनचीच जोरदार चर्चा Alia-bhatt-shared-glamorous-photos-on-social-media-mhaa | News

आलिया भट्टचं ग्लॅमरस फोटोशूट; ‘त्या’ कॅप्शनचीच जोरदार चर्चा Alia-bhatt-shared-glamorous-photos-on-social-media-mhaa | News


अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ने सोशल मीडियावर ग्लॅमरस लूकमधले फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फॉटोंवर लाइक्स आणि कॉमेट्सचा पाऊस पडला आहे.

मुंबई, 31 ऑक्टोबर: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर नेपोटिझम (Nepotism)वरुन तिच्यावरही टीका करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी तिचा सडक 2 (Sadak 2) हा सिनेमा रीलिज झाला होता. पण तोदेखील चांगली कमाई करू शकला नाही. नुकतंच आलियाने केलेल्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोशूटमुळे ती चर्चेत आली आहे. त्यात तिने दिलेल्या कॅप्शनलाही चांगल्या कॉमेंट्स मिळत आहेत. आलियाने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

आलियाच्या ग्लॅमलर अदांमुळे चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कॉमेंट्सचा पाऊस पाडला आहे. आलियाचे हे ग्लॅमरस कपडे फॅशन डिझायनर Goerges Hobeikaच्या स्प्रिंग, समर कलेक्शनमध्येही पाहायला मिळणार आहेत.

ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट कॉम्बिनेशन असलेल्या या ड्रेसमध्ये आलिया अतिशय सुंदर दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने एक छानसं कॅप्शनही दिलं आहे.’ सिंड्रेलाने कधीच राजकुमार हवा अशी इच्छा व्यक्त केली नव्हती तर तिने एक छानसा ड्रेस हवा अशी तिची इच्छा होती’. आलियाच्या फोटोंप्रमाणेच हे कॅप्शनवरही नेटकऱ्यांनी अनेक कॉमेंट्स केल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी आलियाने आपल्या आईचा वाढदिवस दणक्यात साजरा केला होता. सोनी राजदान यांच्या वाढदिवसाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.


Published by:
Amruta Abhyankar


First published:
October 31, 2020, 9:04 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular