Home लेटेस्ट मराठी न्यूज आता हेच बाकी होतं; कोरोना काळात सुरू केलं Antivirus Tiffin Center Odisha...

आता हेच बाकी होतं; कोरोना काळात सुरू केलं Antivirus Tiffin Center Odisha antivirus tiffin center photo viral mhpl | News


इतर फूड सेंटरपेक्षा या फूड सेंटरमध्ये असं काय वेगळं आहे ज्यामुळे याचं नाव Antivirus Tiffin Center असं ठेवण्यात आलं आहे?

भुवनेश्वर, 04 नोव्हेंबर : कोरोनाव्हायरसपासून (Coronavirus) बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ खाण्याकडे लोकांचा कल आहे. त्यामुळे असे बरेच इम्युनिटी बुस्टर पदार्थ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. हे पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते असा दावा करण्यात आला. शिवाय हॉटेल आणि दुकाना कोरोना केक, कोरोना भजी, कोरोना डोसा असे कोरोनाव्हायरस्या आकाराचे पदार्थ दिसू लागले. काही लोकांना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तर काही जणांना कोरोनाबाबत जनजागृती म्हणून असे पदार्थ तयार केले. मात्र आता तर कोणते पदार्थ नाहीत तर चक्क Antivirus Tiffin Center च सुरू करण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर सध्या अँटिव्हायरस टिफिन सेंटरचा फोटो व्हायरल होतो आहे. ओडिशाच्या बेहरामपूरमधील हे टिफिन सेंटर असल्याचं सांगितलं जातं आहे. या टिफिन सेंटरच्या विचित्र नावावरूनच त्याची चर्चा सुरू आहे. एका Reddit अकाऊंटवर या फूट सेंटरचा फोटो टाकण्यात आला.

फोटोमध्ये Antivirus Tiffin Center असा भलामोठा बोर्ड दुकानावर दिसेल. मात्र फक्त नावा हे Antivirus Tiffin Center आहे. प्रत्यक्षात पाहायला गेलं तर इथं कोरोनासंबंधी सर्वच नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. सरकारनं सांगितलेल्या कोणत्याच प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्यात आलेलं नाही. दुकाना पदार्थ बनवून ग्राहकांना देणाऱ्या शेफ आणि विक्रेत्याच्या ना हातात ग्लोव्ह्ज आहेत, ना त्याच्या तोंडावर मास्क आहे. शिवाय इथं असलेले ग्राहकांनीदेखील सोशल डिस्टन्सिंग राखलं नाही आहे.

हे वाचा – पांढरे केस, फॅशन म्हणून नाही तर भीतीनं Hair colour; केसांना दिला लाल रंग

यावरून फक्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या फूड सेंटरनं अशी शक्कल लढवली. ग्राहकांच्या आरोग्याशी या फूड सेंटरला काहीच देणंघेणं नाही.  त्यामुळे यावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.


Published by:
Priya Lad


First published:
November 4, 2020, 11:02 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular