Home लेटेस्ट मराठी न्यूज आता तरी कमी होणार का कांद्याचे भाव? NAFED ने उचललं महत्त्वाचं पाऊल...

आता तरी कमी होणार का कांद्याचे भाव? NAFED ने उचललं महत्त्वाचं पाऊल nafed finalises bidders and issues order for supply of 15000 tonnes of imported onions mhjb | News


सहकारी संस्था नाफेड (National Agricultural Cooperative Marketing Federation of India) ने शुक्रवारी अशी माहिती दिली 15 हजार टन आयात केलेल्या कांद्याचा पुरवठा करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर: मोदी सरकारकडून कांद्याच्या किंमती कमी करण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत. सहकारी संस्था नाफेड (National Agricultural Cooperative Marketing Federation of India) ने शुक्रवारी अशी माहिती दिली 15 हजार टन आयात केलेल्या कांद्याचा (Imported Onions) पुरवठा करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यासंदर्भात निविदा निश्चित करण्यात आल्या आहेत. यामुळे स्थानिक बाजारात उपलब्धता वाढेल आणि किंमती नियंत्रणात राहतील, असे नाफेडने म्हटले आहे.

नियमित निविदा जारी करण्याची योजना

नाफेडने पुढे असे म्हटले की, आयात केलेला कांदा बंदर असणाऱ्या शहरात दाखल झाल्यावर इतर ठिकाणी वितरित केला जाईल. त्यामुळे जलद पुरवठा निश्चित करण्यासाठी राज्य सरकारांना किती प्रमाणात कांद्याची गरज आहे हे विचारण्यात आले आहे. आयात केलेल्या कांद्याच्या अतिरिक्त पुरवठ्यासाठी नाफेडची नियमित निविदा काढण्याची योजना आहे. एका अधिकृत निवेदनानुसार, ‘गुरुवारी तुतीकोरिन आणि मुंबईत पुरवठा करण्यासाठी देण्यात आलेल्या निविदांना नाफेडला चांगला प्रतिसाद मिळाला. काल संध्याकाळी नाफेडने यशस्वी बिडर्सना अंतिम रूप दिले, जेणेकरुन बाजारपेठेत वेळेवर पुरवठा करता येईल’.

(हे वाचा-पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! रांगेत उभं न राहता घरबसल्या जमा करा जीवन प्रमाणपत्र)

नाफेडच्या माहितीनुसार कांद्याची गुणवत्ता आणि आकारावर देखील भर देण्यात आला आहे. भारतीय ग्राहकांच्या पसंतीप्रमाणे कांदा आयात केला जात आहे. भारतात साधारणपणे मध्यम आकाराचे कांदे वापरले जातात, 40 ते 60 मिलीमीटर आकाराच्या लाल कांद्याला अधिक मागणी असते. याउलट परदेशात कांद्याचा आकार 80 मिमी पर्यंत मोठा असतो.

गेल्या वर्षी एमएमटीसीने तुर्कस्तानातून पिवळा, गुलाबी आणि लाल कांदा आयात केला होता. यावर्षी कमीतकमी वेळात चांगल्या प्रतीच्या कांद्याचा पुरवण्यासाठी खासगी आयातदारांना पुरवठा करण्याची ऑफर देण्यात आली आहे. नाफेडने असे म्हटले आहे की, या दरम्यान कांद्याच्या घाऊक आणि किरकोळ किंमतींमध्ये निरंतर घट दिसून आली आहे.

(हे वाचा-PM Kisan: 25 दिवसानंतर तुमच्या खात्यात येणार 2000 रुपये, असा तपासा तुमचा रेकॉर्ड)

महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि इतर राज्यांमधून रब्बीचा जुना साठा (हिवाळा) आणि खरीप (उन्हाळा) चा नवीन साठा कांद्याचे दर नियंत्रणात आले आहेत. नाफेडने अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की, सरकारचा नितीगत हस्तक्षेप, बफर स्टॉक, आयात तसंच नवीन उत्पादनामुळे कांद्याचा पुरवठा वाढेल आणि कांदा लवकरच सामान्य भाव गाठेल. देशात अद्यापही काही ठिकाणी कांद्याचे दर 80 ते 100 रुपये किलो आहेत.


Published by:
Janhavi Bhatkar


First published:
November 6, 2020, 4:56 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular