Home लेटेस्ट मराठी न्यूज आणखी एक सुपरस्टार कोरोना पॉझिटिव्ह; 2 दिवसांपूर्वीच घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट south...

आणखी एक सुपरस्टार कोरोना पॉझिटिव्ह; 2 दिवसांपूर्वीच घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट south indian superstar actor chiranjeevi found corona positive met telangana cm 2 days ago mhpl | Coronavirus-latest-news


गेल्या 5 दिवसांत जे लोक आपल्या संपर्कात आलेत त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन या अभिनेत्यानं केलं आहे.

नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर :  कित्येक सेलिब्रिटी कोरोनाव्हायरसच्या (coronavirus) विळख्यात सापडले. बहुतेकांनी कोरोनाव्हायरसवर मातदेखील केली. आता आणखी एक अभिनेता चिरंजीवीदेखील (chiranjeevi) कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. चिरंजीवीने (chiranjeevi) आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती स्वत:हून दिली आहे. त्याने आपल्याला कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं ट्वीट केलं आहे.

चिरंजीवीनं ट्वीट केलं आहे की, फिल्म आचार्यचं शूट करण्यापूर्वी प्रोटोकॉलनुसार आपण कोरोना टेस्ट केली. आपली ही टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. चिरंजीवीनं आपल्यामध्ये कोणतीही लक्षणं नसल्याचंही सांगितलं आहे. त्याने स्वतला क्वारंटाइन केलं आहे. दरम्यान गेल्या पाच दिवसांत जो कुणी आपल्या संपर्कात आला त्यांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी, असं आवाहन चिरंजीवीनं केलं आहे.

7 नोव्हेंबरला चिरंजीवीं तेलंगणानचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. हैदराबादच्या प्रगती मैदानावर चिरंजीवी आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली. मीडिया रिपोर्टनुसार, यावेळी त्यांनी मास्क लावला नव्हता. मास्क फक्त त्यांच्या हातातच होता. तसंच तिथं सुपरस्टार नागार्जुनही उपस्थित होते.

हे वाचा – विक्रमी रुग्णांनी केली ‘कोरोना’वर मात, मार्केटमध्ये गर्दी वाढल्याने चिंता

काही दिवसांपूर्वीच  बाहुबली अभिनेत्री तमन्ना भाटियानेदेखील कोरोनावर मात केली. त्याआधी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरने कोरोनाविरोधात यशस्वी लढा दिला. तर बच्चन कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना कोरोना झाला होता. मात्र चौघांनीही कोरोनाशी यशस्वी लढा दिला आहे. याशिवाय अभिनेत्री रेखा, आमिर खान, करण जोहर, बोनी कपूर यांच्या स्टाफनाही कोरोना झाला होता. तसंच कित्येक टीव्ही कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी काही जण यातून बरे झाले आहेत.

हे वाचा – WHO अलर्टवर! ‘या’ देशात बदललं कोरोनाव्हायरसचं रुप, लसही ठरणार निरुपयोगी

मराठी मालिकांचे कलाकारही कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. अग्गंबाई सासूबाई या मराठी मालिकेतील अभिनेत्री निवेदिता सराफ यांनाही कोरोना झाला होता. त्याआधी  ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतील अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. असे हिंदी आणि मराठी मालिकेतील बरेच कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले मात्र त्यांनी त्यावर यशस्वीरित्या मात केली.


Published by:
Priya Lad


First published:
November 9, 2020, 3:03 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular