Home लेटेस्ट मराठी न्यूज अवघे पाऊणशे वयमान! 78व्या वर्षी 17 वर्षांच्या मुलीशी लग्न केलं खंर; पण...

अवघे पाऊणशे वयमान! 78व्या वर्षी 17 वर्षांच्या मुलीशी लग्न केलं खंर; पण 22 दिवसांतच… The 78-year-old married a 17-year-old girl but man divorced girl after 22 days of marriage know the reason mhkb | Viral


इंडोनेशियामध्ये लग्नाचा एक अजब किस्सा समोर आला आहे. दोघांच्या वयातील अंतरामुळे या दोघांची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा होती.

इंडोनेशिया, 6 नोव्हेंबर : इंडोनेशियामध्ये लग्नाचा एक अजब किस्सा समोर आला आहे. 78 वर्षीय वृद्धाने एका 17 वर्षीय मुलीशी लग्नबंधनात अडकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. 78 वर्षीय वृद्ध Abah Sarna यांनी मागिल महिन्यात 17 वर्षीय Noni Navita नावाच्या मुलीशी लग्न केलं. पण केवळ 22 दिवसांत नवऱ्याने, मुलीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठवड्यात त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. दोघांच्या वयातील अंतरामुळे या दोघांची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा होती. परंतु आता Abah ने Noni पासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याने, मुलीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

मुलीची बहीण Iyan ने मीडियाशी बोलताना सांगतिलं की, आम्ही त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे हैराण आहोत, कारण दोघांमध्ये सगळं काही सुरळित सुरू होतं. अचानक त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. आमच्या कुटुंबाकडून Abah आणि Noni यांच्या लग्नासाठी कोणतीही समस्या नव्हती. परंतु Abah यांच्या कुटुंबाकडून या लग्नासाठी समस्या होत्या.

(वाचा – बोटीत बसलेल्या महिलांवर व्हेलचा हल्ला; VIRAL VIDEO मध्ये पाहा पुढे नेमकं काय झाल)

घटस्फोट घेण्यावेळी Abah ने Noni वर आरोप केले आहेत. लग्नापूर्वी Noni गर्भवती असल्याचं कारण देत, 78 वर्षीय Abah ने तिच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. परंतु Noni च्या बहिणीने हे आरोप फेटाळले आहेत.

(वाचा –  PHOTOS: एक-दोन नव्हे, तब्बल 58 तास kiss करुन या कपलने केला अनोखा रेकॉर्ड)

रिपोर्टनुसार, Abah ने लग्नावेळी मुलीसाठी 50 हजार रुपये, एक मोटरसायकल आणि गाद्या अशा काही गोष्टी पाठवल्या होत्या. तर Noni च्या कुटुंबाकडूनही हुंडा म्हणून मोठी रक्कम पाठवली असल्याची माहिती आहे.


Published by:
Karishma Bhurke


First published:
November 6, 2020, 11:14 AM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular