Home लेटेस्ट मराठी न्यूज 'अल्लाह हू अकबर'चा नारा आणि हातात कुराण; कोण होता हल्लेखोर? France church...

‘अल्लाह हू अकबर’चा नारा आणि हातात कुराण; कोण होता हल्लेखोर? France church attack 20 year old tunisian muslim suspected mhkk | News


पोलिसांच्या कारवाईत हा हल्लेखोर जखमा झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पॅरिस, 30 ऑक्टोबर : 20 वर्षीय माथेफिरून चर्चमध्ये घुसून एका महिलेचा शिरच्छेद करत उपस्थितांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्सच्या नीस चर्चमध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यातील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ट्यूनीशियाचा रहिवासी असलेल्या 20 वर्षांच्या नागरिकानं ही हत्या केल्याची माहिती मिळत आहे. हातात कुराण आणि अल्लाह हू अकबरचा नारा देत हा हल्लेखोर चर्चमध्ये घुसला आणि त्याने एका महिलेसह दोन जणांवर चाकूने सपासप वार करत जागीच ठार केलं.

ट्यूनीशियाचा हा तरुण इटलीमार्गानं फ्रान्समध्ये आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास करताना दहशतवादीविरोधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा माणूस भूमध्य सागरी भागातल्या लम्पेडुसा या बेटावरुन 20 सप्टेंबरला इटलीला आला होता. त्यानंतर ते 9 ऑक्टोबर रोजी इटलीहून पॅरिसला पोहोचले. त्याच्या फ्रान्सला पोहोचल्याची माहिती इटालियन रेडक्रॉसच्या एका व्यक्तीच्या कागदपत्रातून समोर आली आहे. ट्युनिशियाच्या य़ा नागरिकानं हातात कुराण पकडून चर्चवर हल्ला केला. पोलिसांच्या कारवाईत हा हल्लेखोर जखमा झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नीस शहराच्या महापौरांनी हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता व्यक्त केली, कारण त्यामागे आहे फ्रान्समध्ये सुरू असलेला धार्मिक तणाव. काही दिवसांपूर्वीच फ्रान्समधल्या एका शालेय शिक्षाकाचा याच प्रकारे शिरच्छेद करण्यात आला होता. चेचेन वंशाच्या एका व्यक्तीने शिक्षकाचा असा क्रूर खून करण्यामागचं कारण म्हणे मोहम्मद पैगंबरांचं व्यंगचित्र या शिक्षकाने नागरिक शास्त्राच्या तासाला वर्गात दाखवलं. या इस्लामविरोधी कामाची शिक्षा म्हणून त्याचा शिरच्छेद केल्याचं या चेचेन माथेफिरूने सांगितलं.

शिक्षकाच्या हत्येनंतर हा दहशतवादाचाच प्रकार असल्याचं जाहीर करत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी धर्मांध मुस्लिमांविषयी कडक धोरण असल्याचं जाहीर केल्यानंतर मुस्लीम देशांनी फ्रान्सचा निषेध केला होता. पैगंबरांच्या व्यंगचित्राची पाठराखण केल्याचा आरोप मॅक्रॉन यांच्यावर होत आहे. त्यामुळे अनेक मुस्लीम धर्मीयांचा त्यांनी रोष ओढवून घेतला आहे.


First published:
October 30, 2020, 9:04 AM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular