Home लेटेस्ट मराठी न्यूज अर्णब गोस्वामींबद्दल फडणवीसांनीही व्यक्त केली चिंता, हायकोर्टाला केली विनंती   | News

अर्णब गोस्वामींबद्दल फडणवीसांनीही व्यक्त केली चिंता, हायकोर्टाला केली विनंती   | News


‘राज्यातलं महाविकास आघाडी सरकार ज्या पद्धतीने गोस्वामी यांना वागणूक देत आहे ती योग्य नाही. ‘

मुंबई 9 नोव्हेंबर: रिपब्लिक टीव्ही समुहाचे मुख्य संपादक (Republic TV editor ) अर्णब गोस्वामींना  (arnab goswami) मिळणाऱ्या वागणुकीबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. राज्यातलं महाविकास आघाडी सरकार ज्या पद्धतीने गोस्वामी यांना वागणूक देत आहे ती योग्य नाही. या प्रकरणाची हायकोर्टाने सुमोटो याचिका (suo moto cognizance) दखल करून घ्यावी अशी विनंतीही त्यांनी केली.

राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने गोस्वामी यांच्या अटकेपासून ते आत्तापर्यंत ज्या पद्धतीने कृती केली त्याबद्दलही फडणवीस यांनी संशय व्यक्त केला. या आधी राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून गोस्वामी यांच्या सुरक्षेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती.

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनीही अर्णब गोस्वामींच्या प्रकृती आणि सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. राज्यपालांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत आपली चिंता व्यक्त केली. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू देण्याचे तसंच त्यांच्याशी बोलण्याची अनुमती द्यावी, अशीही सूचना राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली.  राज्यपालांनी यापूर्वी सुद्धा अनिल देशमुख यांच्याकडे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरून चिंता व्यक्त केली होती.

दरम्यान, अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना अलिबागमधील कोरोना सेंटर असलेल्या एका शाळेमध्ये  ठेवण्यात आले होते. चार दिवस तिथे ठेवल्यानंतर गोस्वामी यांची रवानगी थेट तळोजा कारागृहात करण्यात आली होती.


Published by:
Ajay Kautikwar


First published:
November 9, 2020, 3:59 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular