Home लेटेस्ट मराठी न्यूज अमरावतीत सुवर्णकाराच्या घरी दरोडा, 3 जणांना जखमी करत 7 तोळे सोने लुटलं...

अमरावतीत सुवर्णकाराच्या घरी दरोडा, 3 जणांना जखमी करत 7 तोळे सोने लुटलं Robbery in Amravati 3 people injured latest updates mhas | Crime


लुटारूंनी चाकूचा धाक दाखवत सात तोळे सोन्याचे दागिने लुटले आहेत.

अमरावती, 8 नोव्हेंबर : अमरावती शहरातील माधवनगर येथे राहणाऱ्या एका सुवर्णकाराच्या घरात दोन लुटारूंनी घुसून चाकूचा धाक दाखवत त्यांच्या घरातून सात तोळे सोन्याचे दागिने लुटले आहेत. तसंच तीन जणांना जखमीही केले आहे.

घरात घुसलेल्या चोरांचा प्रतिकार केला असता त्यांनी घरातील तीन जणांना चाकूने जखमी करून हवेत गोळीबार करत पळ काढला. या मोठ्या धाडसी दरोड्याने अमरावतीत खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्वत्र नाका बंदी केली. मात्र अद्याप आरोपींना पकडण्यात यश आलेलं नाही.

हेही वाचा – कोल्हापूर हादरलं, भाजप नगरसेविकेच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

शुभांगी माथने या एकट्या घरी होत्या. त्यांना चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी घरातील सर्व दागिने व त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले. दरम्यान प्रदीप माथने हे घरी आले असता त्यांना देखील चोरट्याने चाकूने जखमी केले. त्यांनंतर चोरट्याने रस्त्यावर उभी असलेली दुचाकी घेऊन हवेत गोळीबार करून पळ काढला. रात्री साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.


Published by:
Akshay Shitole


First published:
November 9, 2020, 12:01 AM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular