Home लेटेस्ट मराठी न्यूज अंबरनाथ: गुंडांनी वर्दीवरच टाकला हात, स्टेशन बाहेर पोलिसावर तलवारीने प्राणघातक हल्ला |...

अंबरनाथ: गुंडांनी वर्दीवरच टाकला हात, स्टेशन बाहेर पोलिसावर तलवारीने प्राणघातक हल्ला | News


आरोपींची ओळख पटली नसली तरी ज्या पद्धतीने शस्त्रांनी त्यांनी हल्ला केला त्यावरून ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

अंबरनाथ 23 ऑक्टोबर: कोरोना काळात आघाडीवर लढत नागरीकांचं रक्षण करणाऱ्या पोलिसावरच शुक्रवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. अंबरनाथ मधली ही घटना असून आरोपींनी पोलीस स्टेशनच्या बाहेरच हा हल्ल्याची केल्याची माहिती आहे. बाळा चव्हाण असं जखमी पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. चव्हाण हे सेंट्रल पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

ट्राफिक जॅममध्ये भांडण झाल्याने आरोपींना हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे. आरोपी हे आपली कार सोडून रिक्षा घेऊन पोलीस स्टेशनच्या परिसरात आले. त्यांच्या हातात तलवार होती.

रिक्षातून उतरल्यानंतर काही कळण्याच्या आतच त्यांनी तलवारीने सपासप वार करायला सुरूवात केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे चव्हाणही घाबरून गेले. त्यानंतर हल्लेखोरांना पळ काढला. इतर पोलीस कर्मचाऱ्यांना घटना कळताच त्यांनी चव्हाण यांना तातडीन खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

ट्राफिकमध्ये त्यांनी कार चुकीच्या पद्धतीने लावली होती त्यावरून विचारणा केल्यानंतर त्यांनी हल्ला केल्याचं सांगितलं जातं. आरोपींची ओळख पटली नसली तरी ज्या पद्धतीने शस्त्रांनी त्यांनी हल्ला केला त्यावरून ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

चव्हाण यांच्यावर आता उपचार सुरू आहेत. पोलिसांवरच हल्ल्या करण्याची हिंम्मत करणाऱ्या या गुंडाचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी खास पथकं स्थापन केली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.


Published by:
Ajay Kautikwar


First published:
October 23, 2020, 9:59 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular